Thursday, December 31, 2009

***********

माझ्या कविता वाचतो जेव्हा मीच पुन्हा पुन्हा
तेव्हा तेव्हा त्यांच्यातल्या अद्भुत अत्तरी शब्दांनी
मी पुरता मुग्ध होतो आणि सुखावतो माझ्या शब्दशक्तीवर
जी खरं तर आहे अधांतरी शोकस्तब्ध कवितांच्या आत्म्यावरच स्वार



---------------------

Thursday, August 06, 2009

*******

जेव्हा तुझ्या एकटेपणाला समज़ून घेण्याची मनोज्ञता मी हरवून बसतो,
तेव्हा मी अनुभवतो मला एका अपराध्याच्या पिंज़र्‍यात,
तो पिंज़रा ज्याचं नाव आहे शहाणपण, व्यवहार,
पण मग मी करू तरी काय?
मी आहे तितकाच हतशक्त या पिंज़र्‍याच्या भयाणतेने,
बाहेर पडावं तर वेड आणि अव्यवहार्यतेचे सापळे आहेत
आत रहावं तर शहाणपण आणि व्यवहार्यतेचे अपराधीपण...!


-------------------------

Friday, June 19, 2009

देरिदा प्रेम आणि सत्‌ यांवर...

देरिदाचा हा एक वीडियो:

http://www.youtube.com/watch?v=dj1BuNmhjAY&feature=related 

यात तो प्रेम (LOVE) आणि स‌त्‌ (BEING) यावर बोलत आहे. बोलत प्रेम यावर आहे पण त्याचा संबंध सत्‌ शी कसा आहे ते ओघाने आले आहे. ज़रूर बघावा असा आहे. तो जे म्हणत त्यातील काही भाग, पद्यात(?) साररूपाने असा:

माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणतो जेव्हा मी
तेव्हा मी एकमेव, अद्वितीय अशा तुझा
विचार करीत असतो असं मला वाटतं खरं
पण कालौघात मला असं कळतं की तुझ्यातले जे
गुण मला प्रिय होते त्यांना मी तू मानत होतो,
आता जेव्हा मला काही अन्य गुण कळतात, किंवा
अजिबातच सापडत नाहीत तेव्हा मी म्हणतो की
माझं तुझ्यावर प्रेम नाही,
पण मी जेव्हा म्हणालो माझं तुझ्यावर प्रेम आहे,
तेव्हा त्याचा अर्थ तो नव्हताच
आणि आज़ जेव्हा मी म्हणतो माझं तुझ्यावर प्रेम नाही
तेव्हा त्याचा अर्थ तो नाहीच!

ज़रा गद्यात्मक सार असा:

ज्ञाता (knower) आणि ज्ञेय (knowee, the thing that is being known) यातील संबंधाला ज्ञान म्हणतात. वस्तुतः ते असत नाही तेव्हा एखादी गोष्ट ‘आहे’ म्हणजे त्या संबंधाने असते. त्या संबंधाशिवाय असत नाही. आपण ज्याला असणे समज़तो ते इतकेच असते पण आपण त्याला objectively अस्तित्वात आहे असे समज़त असतो। interestingly the problem of BEING and LOVE is the same. The only difference: in love, we believe qualities to be individual. BEING मध्ये what (काय=ज्ञेय) आणि who (कोण=ज्ञाता) असे दोन प्रश्न असतात प्रेमातही तेच काय=गुण, कोण=व्यक्ती. थोडक्यात:
स‍त्‌ किंवा अस्तित्व किंवा BEING चे जे प्रश्न आहेत किंवा गूढ आहे तेच प्रेमाचे आहे फरक असा की आपल्याला ज्ञानाची ( ज्ञातृत्वामुळे ज्ञान होण्याची) आणि (सत्त्वामुळे) असण्याची इतकी सवय झालेली असते किंवा तेच आपले असणे असते, त्यामुळे त्याची ज़ाणीव तशी तटस्थ होत नाही. पण, प्रेम आपण काळात सुरु होतांना आणि संपताना अनुभवतो म्हणून व्यथित किंवा आनंदी होतो.

-------------------------------------------------------------------------------------------------

शाब्द

शाब्द

About Me

My photo
मी एक आपला साधासुधा बर्‍यापैकी सुमार असा भाषाविज्ञानाचा विद्यार्थी! बाकी एखाद्या Definite Description चा निर्देश माझ्याने व्हावा असले काही कर्तब आपण गाज़वलेले नाही. हां, एवढं कदाचित म्हणता येईल की मराठीतून आंतरजालावर शीवर लिहणारा पहिला...