Monday, July 05, 2010

माझ्यावर रागावल्यावर मला अधिकच आराध्य होणार्‍या देवते!

माझ्यावर रागावल्यावर मला अधिकच आराध्य होणार्‍या देवते!

तुला जितकं चिडवू, तितकी तू सहज चिडतेस!
चिडून मला खूप छान-छान रागावतेस आणि आपलीशी होतेस!

रागवतेस, कधी कधी तर कोपच पावतेस
आणि मला देतेस सदाचार, सत्प्रवृत्त्तीचे किती सोज्ज्वळ उपदेश
प्रत्येक रागावण्यातून, प्रत्येक कोपण्यातून किती आपलीशी होतेस!

म्हणूनच, तुला "रागावणार नसशील तर..." असं कसं म्हणू?
"रागावणार असशील तर..." म्हणतो:
रागावणार असशील तर एक सांगू?
तू रागवणार असशील तर मला खूप खूप आवडतेस!



शाब्द

शाब्द

About Me

My photo
मी एक आपला साधासुधा बर्‍यापैकी सुमार असा भाषाविज्ञानाचा विद्यार्थी! बाकी एखाद्या Definite Description चा निर्देश माझ्याने व्हावा असले काही कर्तब आपण गाज़वलेले नाही. हां, एवढं कदाचित म्हणता येईल की मराठीतून आंतरजालावर शीवर लिहणारा पहिला...