माझ्यावर रागावल्यावर मला अधिकच आराध्य होणार्या देवते!
तुला जितकं चिडवू, तितकी तू सहज चिडतेस!
चिडून मला खूप छान-छान रागावतेस आणि आपलीशी होतेस!
रागवतेस, कधी कधी तर कोपच पावतेस
आणि मला देतेस सदाचार, सत्प्रवृत्त्तीचे किती सोज्ज्वळ उपदेश
प्रत्येक रागावण्यातून, प्रत्येक कोपण्यातून किती आपलीशी होतेस!
म्हणूनच, तुला "रागावणार नसशील तर..." असं कसं म्हणू?
"रागावणार असशील तर..." म्हणतो:
रागावणार असशील तर एक सांगू?
तू रागवणार असशील तर मला खूप खूप आवडतेस!
Subscribe to:
Post Comments (Atom)
शाब्द
Blog Archive
About Me
- चिन्मय धारूरकर/Chinmay Dharurkar
- मी एक आपला साधासुधा बर्यापैकी सुमार असा भाषाविज्ञानाचा विद्यार्थी! बाकी एखाद्या Definite Description चा निर्देश माझ्याने व्हावा असले काही कर्तब आपण गाज़वलेले नाही. हां, एवढं कदाचित म्हणता येईल की मराठीतून आंतरजालावर शीवर लिहणारा पहिला...
3 comments:
क्या बात है। अप्रतिम
आपला,
(वाचक) धोंडोपंत
तूझ्या साठी एके ठिकाणी वाचलेली माहिती देत आहे, बघ पटतेय का "शंकराच्या गळ्यातील मुंडमालेला शैव दर्शनात एक गूढ अर्थ आहे. या माळेत 50 किंवा 51 नरमुंड असतात. ही मुंडकी संस्कृत भाषेतील वर्णांचे (ॐ सहित किंवा रहित) प्रतिनिधित्व करतात. अर्थातच ही मुंडमाला प्रत्यक्षात वर्णमाला आहे. थोडक्यात असे सांगता येईल की शैव दर्शनाप्रमाणे नादाच्या मुळ स्फुरणातून वा स्पन्दनातून या सर्व सृष्टीची निर्मीती झालेली आहे. भाषेतील अक्षरे वा ध्वनी ही केवळ नादाची एक स्थुल अभिव्यक्ती आहेत. आता आपल्याला अक्षरांना अ + क्षर (कधीही नष्ट न होणारे) असे का म्हणतात त्याविषयी अंधूकशी कल्पना येऊ शकेल.
प्रभंजन
your blog is really a ggod venture to venture knowledge and so many strange things. ur poems are like stream of consciousness .
i can call them postmodern poems.
here is link of my blog.
mahashwetaa.blogspot.com
i write gazals in marathi and urdu.
i will like u to read them.
thanks
prashant dharmadhikari
pune.
Post a Comment